व्हिस्कीचे दुष्परिणाम | Side Effects Of Whisky In Marathi

Side Effects Of Whisky In Marathi – आपल्या देशात किंवा जगात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड आहे. पण मानवी शरीरावर याचे फायदे , आणि दुष्परिणाम कसे होतात. हे आपण आता जाणून घेणार आहोत . व्हिस्कीचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे आता आपण पाहूया.

प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केल्याने शरीरात विषारी तत्व जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्वचेला नीट ठेवणार्या शरीरात असलेल्या नैसर्गिक तत्व कमी होतात. आणि हे परिणाम आपल्याला काळानुसार उद्भवून येतात. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते ,आपण एखाद्या गोष्टीचा अति प्रमाणात अपार केला कि त्याचे दुष्परिणाम होतातच आणि नाकारता येत नाही , तसेच व्हिस्की बदडले आपण बघणार आहोत , कि व्हिस्कीचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात. अतिमद्यपान केल्याने त्वचेवर आणि आपल्या शरीरावर अजून काय काय परिणाम होतात हे जाणून घ्या.

Table of Contents

व्हिस्की चे दुष्परिणाम | Side Effects Of Whisky In Marathi

कोणतीही गोष्ट प्रमाणात केली तर चांगली असते हे आपण नक्कीच ऐकले असेल. मी ती कोणतीही गोष्ट असो. तसेच व्हिस्कीचे सुद्धा आहे. योग्य प्रमाणात व्हिस्की चे सेवन न केल्यास काय दुष्परिणाम होऊ शकतात, क्सहला आपण बघूया,

1. व्हिस्की मुळे त्वचेवर सुद्धा दुष्परिणाम दिसून येतात

मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक मानले गेले आहे . पण तुम्हाला माहित आहे काय याचा परिणाम थेट त्वचेवरही होतो. दररोज व्हिस्की (Alcohol) घेतल्याने त्वचा कोरडी आणि सैल होण्याचा धोका वाढतो. जास्त व्हिस्की पिण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी पाणी जास्त प्रमाणात प्यावे. अन्यथा त्यांची त्वचा हळूहळू कोरडी व्हायला सुरुवात होते. त्वचा कोरडी झाली की त्यावर लाल पुरळ, लालसरपणा किंवा इत्यादी परिणाम दिसून येतात.

त्वचेवर मुरूम यायला सुरुवात होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे . हळूहळू त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होते. असे म्हणतात की, शरीरात विषारी द्रव्य तयार झाल्याने तुम्ही अकाली वृद्धत्वाकडे झुकता. व्हिस्की तहान भागवते पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करते. पाणी कमी पिल्याने चेहरा निस्तेज वाटतो आणि हळूहळू तुम्ही वयस्क दिसू लागता. सुरकुत्या आल्यानंतर तर चेहरा कमी वयातच आपले वलय गमावतो. शरीरातील ओलावा कमी होता. त्यामुळे व्हिस्की पिण्याचे प्रमाण नियमित असावे .

2. व्हिस्की मुळे त्वचेवर पुरळ येऊ शकते


व्हिस्की शरीरातील विषारी द्रव्य वाढवते. यामुळे त्वचेवर मुरूम आणि तोंड यायला यायला सुरुवात होते. व्हिस्की पिण्याची सवय शरीरातील पोषक तत्व कमी करतात. जर शरीर आणि त्वचा हेल्दी ठेवायची असेल तर व्हासिक्य पिणे कमी प्रमाणात असणे फार गरजेचे आहे .


3. व्हिस्की मुळे त्वचेवर लालसर पणा येण्याची शक्यता असते


बरेचदा काही ड्रिंकचे सेवन केल्याने त्वचेला खूप नुकसान पोचते. यामुळे त्वचेला खाज सुटते. त्वचा लालसर होते. अशा घातक ड्रिंक पिताना तर खूप छान वाटतात. पण यामुळे तुमच्या त्वचेला दीर्घकाळ नुकसान पोचते.

4. व्हिस्कीमुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते

अनियमित व्हिस्की पिल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होऊ लागते आणि त्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.म्हणजेच वृद्धत्व दिसायला सुरवात होते. अकाली सुरकुत्या दिसू लागल्याने माणूस तरुण वयातच म्हातारा दिसू लागतो.

5. व्हिस्की मुळे पाचन-क्रियांवर होणारा दुष्परिणाम

व्हिस्की अतिप्रमाणात पिल्याने तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचते, हे तुमच्या लगेच लक्षात येणार नाही. पण सतत पिण्याचे हे दुष्परिणाम तेव्हाच दिसून येतील जेव्हा तुमचे जास्त नुकसान झाले असेल. आणि तुम्ही जितके जास्त प्याल तितके जास्त नुकसान होईल. मद्यपान केल्याने तुमच्या पचनसंस्थेतील ऊतींचे नुकसान होऊ शकते. हे अन्न पचवण्याची आणि पोषक आणि जीवनसत्त्वे शोषून घेण्याच्या तुमच्या आतड्याच्या क्षमतेला देखील हानी पोहोचवू शकते. जे लोक खूप व्हिस्की पितात त्यांना अल्सर आणि मूळव्याध सारख्या समस्या देखील होऊ शकतात. जे लोक भरपूर व्हिस्की पितात त्यांना देखील कर्करोग होण्याचा धोका असतो. जे लोक वारंवार मद्यपान करतात त्यांना तोंड, घसा, अन्ननलिका, कोलन किंवा यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

6. व्हिस्की मुळे लैंगिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम – Sexual Issues

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की जे पुरुष भरपूर व्हिस्की पितात त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता जास्त असते. जास्त व्हिस्कीचे मद्यपान केल्याने सेक्स हार्मोन्स कमी होतात आणि तुमची कामवासना कमी होते. तसेच, ज्या स्त्रिया भरपूर व्हिस्की चे मद्यपान करतात त्यांना अनेकदा अनियमित मासिक पाळीची तक्रार असते. अल्कोहोलमुळे वंध्यत्व देखील होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान भरपूर व्हिस्की पिणाऱ्या महिलांना अकाली प्रसूती आणि गर्भपात होण्याचा अधिक धोका असतो. ज्या स्त्रिया गरोदर असताना व्हिस्की पितात त्यांच्या जन्माला येणा-या बाळाला धोका असतो.

या गोष्टींवरून एक गोष्ट स्पष्ट होते, व्हिस्की चे सेवन हे कोणत्याही प्रकारे चांगले म्हणता येणार नाही, त्यामुळे दारूचे सेवन करू नका आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

FAQ :- side effects of whisky in Marathi

1}व्हिस्कीचे कोणते दुष्परिणाम होतात ?

प्रत्येक मानवी शरीर हे भिन्न-भिन्न प्रकारचे असते , त्या नुसार व्हिस्की चे परिणाम त्यांचा शरीरावर होत असतात , असं काही निसश्चितच नाही कि त्याचा वाईट परिणाम तुमचा शरीरावर होऊ शकतो , फक्त व्हिस्की चे प्रमाण अल्प असावे

2} व्हिस्कीचे आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात ?

व्हिस्की अतिप्रमाणात घेतल्याने त्याचे दुष्परिणाम होतात जसे कि , अर्धंडोक दुखी , मळमळणे , अपचन, चक्कर येणे , आणि आपल्या लिव्हर-वर त्याचा ताण पडतो .

3} व्हिस्की-मुळे आपल्या त्वचेवर कोणते पारिणाम होतात ?

बऱ्याच लोकां -मध्ये व्हिस्की मुळे त्वचेवर परिणाम दिसून आले आहेत . उदा , त्वचा कोरडी पडणे , लवकर वृधत्व येणे , चेहऱ्यावर लाली येणे, अंगावर खाज येणे इत्यादी , दुष्परिणाम शरीरानुसार होत असतात .

4} लैंगिक आरोग्यावर काय परिणाम होत ?

व्हिस्की चे अतिअप्रमाण हे तुमचा शरीरातील सेक्स लाईफ कमी करते , तुमचा स्पेर्मकाउंट सुद्धा कमी व्हायला सुरवात होते . वैज्ञानिकांच्या म्हणण्या नुसार व्हिस्कीचे अतिप्रमाणं हे त्यांचा सेक्सलाईफ वर हानिकारक ठरतात

Conclusion :- व्हिस्कीचे दुष्परिणाम

आम्ही ह्यामध्ये तुम्हाला सांगितले आहे कि व्हिस्की चे कुठले दुष्परिणाम होऊ शकतात , तर व्हिस्की पिणे ही काही वाईट गोष्ट नसून तिच्या आहारी जाणं किंवा तिची आपल्याला शरीराला जास्त सवय लावून घेणं हि वाईट गोष्ट ठरते . व्हिस्की कमी प्रमाणात घेतल्याने त्याचा फारसा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येत नाही , पण तुम्ही व्हिस्की जास्त प्रमाणात घेतली कि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. आम्ही वर सांगितल्या प्रमाणे व्हिस्कीचे दुष्परिणाम होऊ शकतात .

Team, WhiskyPrices.com

धन्यवाद,

Print Friendly, PDF & Email

Leave a Comment

close

Ad Blocker Detected !

Please Disable Ad Blocker To Continue....

Refresh

Top 10 Champagnes That You Must Try In This Lifetime What Will You Prefer To Loose Belly Fat Beer Or Whisky? Best Wines Brands in USA 10 Best Drinks For Men Most Expensive Beers Brands