Side Effects Of Desi Daru In Marathi – नमस्कार , देशी दारू हि तुम्हाला माहीतच असेल. गावागावांमध्ये हि देशी दारू खूप विकली जाते. गावांमधील लोक आणि मजूर लोक याचे खूप सेवन करतात असे आढळून आले आहे. पण देशी दारूच्या अति सेवनाने कोणकोणते नुकसान होतात हे माहिती आहे का. देशी दारू च्या अति सेवनाने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होऊन जाते. पहिले ,जुने लोक दारूचा उपयोग औषध म्हणून थोडा थोडा करायचे. तर यांच्यापासून हे सुद्धा माहित होते कि जर दारूचे सेवन कमी प्रमाणात केले तर त्याचे फायदे देखील आहे. परंतु तुम्ही दारू रोज जास्त प्रमाणात सेवन करत असेल तर ति तुमच्या शरीरासाठी आणि जीवनासाठी हानिकारक आहे.
दारू चे नुकसान मोठमोठ्या राजा महाराजांनी सुद्धा अनुभवले आहे. दारु बद्दल असे बोलले जाते कि मोठ्यात मोठा श्रीमंत माणसाला सुद्धा जमिनीवर आणते. दारू हि एकाच प्रकारे माणसाला नुकसान नाही पोहोचवत. तर ती आर्थिक दृष्ट्या , मानसिक दृष्ट्या , आणि शारीरिक दृष्ट्या नुकसान पोहोचवते. तर देशी दारूने होणारे नुकसान आपण खाली बघूया.
Table of Contents
देशी दारूने होणारे नुकसान – Side Effects Of Desi Daru In Marathi
1. आपल्या शरीराला आजारी बनवते.
जर कोणी देशी दारूचे सेवन रोज करत आहे आणि जास्त प्रमाणात करत आहे तर दारू त्याच्या शरीराला कमकुवत आणि आजारी बनवते. दारू डायरेक्ट आपल्या शरीरातील यकृतावर प्रभाव टाकते. याच्या जास्त सेवनामुळे यकृताला सूज येते आणि असे झाल्यावर ते काम करणे बंद करते. त्यामुळे यकृत फेल सुद्धा होते.
तुम्हाला माहित असेलच कि यकृताने जर बरोबर काम नाही केले तर तुमचे खाणे पिणे देखील सुद्धा बंद होऊ शकते. आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो. दारू जास्त पिल्याने शरीरामध्ये पित्ताचा त्रास अधिक वाढतो, शरीरामध्ये गर्मी खूप वाढून जाते , शरीरामध्ये ग्लुकोज ची कमी होते आणि शरीर कमकुवत होते.
2. मानसिक त्रास होणे.
दारू पिण्याचे नुकसान फक्त शरीरापुरतेच मर्यादित आहे असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा, दारू तुम्हाला मानसिक आजारी सुद्धा बनवते. हे तुमची विचारशक्ती संपवण्याचे काम करते आणि तुमचे मन कमकुवत करून टाकते. तुमच्या मनामध्ये दु:ख वाढवते आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी दुःखी वाटू लागते. अल्कोहोल तुमच्या न्यूरोट्रांसमीटरशी संपर्क साधते ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन कायमचे बिघडू शकते. दारूचे जास्त सेवन केल्याने तुमच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
हे सेरोटोनिन आणि डोपामाइन यांसारख्या मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाच्या हार्मोन्सची पातळी कमी करते, ज्यामुळे मानसिक आजाराची समस्या उद्भवते.
3. चिंता आणि नैराश्याला प्रोत्साहन.
दारूचे अतिसेवन केल्याने ते तुम्हाला नरश्याकडे ढकलते . जर तुम्ही आधीच आजारी असाल तर ते तुमच्यासाठी अत्यंत हानिकारक बनते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अस्वस्थता आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. काही लोक त्यांच्या चिंता किंवा काळजीवर मात करण्यासाठी दारूचे सेवन करतात.
हे सुद्धा वाचा.
4. Nervous System ला कमकुवत बनवते.
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव म्हणजे Nervous System आपली असते . जी संपूर्ण शरीरात सिग्नल्सची देवाणघेवाण करते . दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे Nervous System खूप कमकुवत होते. अनेक वेळा अशी परिस्थिती येते की Nervous System पूर्णपणे संपते आणि कोणतेही औषध तिला पूर्वीसारखी बनवू शकत नाही. जेव्हा माणूस सुरुवातीला दारूचे सेवन करतो तेव्हा त्याला खूप चांगले वाटते. कारण Nervous System सुन्नतेमुळे, भीती आणि चिंता वाटण्याची तिची शक्ती काम करणे थांबवते.
5. लैंगिक शक्ती कमी करते.
सुरुवातीला जेव्हा लोक कमी प्रमाणात दारूचे सेवन करतात तेव्हा ती त्यांच्यासाठी चांगले कार्य करते. कारण जेव्हा मनात कोणत्याही प्रकारची भीती तणाव नसतो तर त्याची लैंगिक क्षमतेवर पण फरक पडत नाही.
पण जेव्हा माणसाची दारूच्या सेवनाची लिमिट वाढते तेव्हा त्याच्या लैंगिंक क्षमतेवर फरक पडायला सुरुवात होते. त्याला इरेक्टाइल डिसफंक्शन सारखी समस्या उध्दभवते.
6. झोपेची गुणवत्ता खराब करते.
सुरुवातीला रात्री जेव्हा दारूचे सेवन करून माणूस झोपतो तर त्याला काही दिवस खूप चांगली झोप लागते. ते त्याला खूप चांगले वाटायला लागते. पण जशी वेळ निघत जाते तसे सेवन करण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. त्यामुळे नंतर एक वेळ अशी येते कि जर जास्त दारू सेवन नाही केली तर तुम्हाला झोप लागत नाही. तर विचार करा जर झोप लागली नाही आणि भय चिंता त्या व्यक्तीला वाटत राहिली तर त्याचा किती मोठा फरक शरीरावर पडू शकतो. काही दिवसांनी तो व्यक्ती तडपायला चालू होतो आणि ते खूप लवकर त्याला मानसिक रोगी बनवून टाकते.
7. आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवते.
दारू हि महाग व्यसन आहे. आणि तुम्हाला त्याची सवय लागली आणि तुम्ही जर तिचे रोज सेवन तर ते तुम्हाला खूप महागात पडेल. हळू हळू तुम्ही पिण्याचे प्रमाण वाढवाल त्याचबरोबर त्यासाठी लागणारे पैसे देखील वाढतील. जर तुम्ही श्रीमंत असाल तर ती तुम्हाला गरीब बनवेल. आणि जर तुम्ही गरीब आहे तर ती तुम्हाला भिकारी सुद्धा बनवेल. अशाप्रकारे, दारू फक्त स्वतःसाठी खर्च करत नाही तर ती तुम्हाला त्याच्याबरोबर जाणाऱ्या वाईट गोष्टींवर सुद्धा भरपूर पैसे खर्च करायला लावते . एक दिवस असा येतो की कुटुंबाचे योग्य पालनपोषण करणे तर दूरच पण तुमच्याकडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी औषधांसाठीही पैसे राहत नाही.
8. तुमचा समाजात असलेला आदर घालवते.
दारू पिण्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे ती समाजात असलेला तुमचा आदर कमी करते. तुमचे स्वतःचे कुटुंबीय देखील तुमचा आदर करणे सोडून देतात. तुमच्या मुलांसमोर देखील तुमची प्रतिमा खूप खराब होते. जेव्हा हे घडते तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का बसतो आणि तुम्हाला स्वतःला कमी पडल्यासारखे वाटते. माणूस पैसे परत मिळवू शकतो, परंतु गमावलेला आदर परत मिळवणे कठीण आहे.
9. हृदय कमकुवत होते.
सुरुवातीला जेव्हा दारू अगदी कमी प्रमाणात सेवन करतो वापरतो तेव्हा ते आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते. त्यातून हृदय मजबूत होते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. पण हळूहळू जेव्हा आपण जास्त दारू चे सेवन करू लागतो, तेव्हा त्यातून हृदय कमकुवत होऊ लागते. यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
निष्कर्ष – Side Effects Of Desi Daru In Marathi
हि होती आमची आजची पोस्ट. आशा करतो कि देशी दारू चे सेवन केल्याने Side Effects Of Desi Daru In Marathi काय नुकसान होऊ शकते हे तुम्हाला यामधून समजले असेल. तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि दुसर्यांना सुद्धा नक्की सांगा.
धन्यवाद.
Team, mywhiskyprices.com
आमच्या इतर पोस्ट.