दारू चे दुष्परिणाम ( Side Effects Of Alcohol ) – जर तुम्हालाही रोज दारू पिण्याचे व्यसन असेल तर विज्ञानानुसार तुम्हाला दारूचे शरीरावर होणारे परिणाम माहिती असणे फार गरजेचे आहे. हल्ली दारूचा ट्रेंड वाढत आहे. पिणारे ते पिण्यासाठी फक्त निम्मित शोधत असतात. तुम्ही आनंदात असलात तरी पिणार आणि दुःखात सुद्धा पिणार. एकदाच दारू पिण्याचे व्यसन लागले कि, ते लवकर सोडणं अशक्य जातं. बहुतांश लोक नवीन वर्षाची पार्टी, वाढदिवस, लग्न इत्यादी कोणत्याही खास प्रसंगी दारूचे सेवन करतात. पण, काही लोकांना दारूशिवाय मुळीच राहिला जात नाही . अशा लोकांना दारूचे व्यसन असते. अर्थात तुम्ही अधूनमधून किंवा रोज पितात, अल्कोहोल एक प्रकारे शरीरासाठी हानिकारक आहे (दारूचे दुष्परिणाम). कोणत्याही प्रकारची नशा, मग ती दारू, ड्रग्ज किंवा धूम्रपान असो, शारीरिक आणि मानसिक आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते. तुम्हालाही दारूचे व्यसन असेल तर विज्ञानानुसार तुम्हाला दारूचे दुष्परिणाम हे माहितीच असायला हवे. (Side effects of alcohol )

Table of Contents
दारू (Alcohol) डोक्यासाठी किंवा मेंदूसाठी हानिकारक आहे :-
(side Effects OF Alcohal) श्लेष्मल त्वचा तोंडात प्रवेश करताच अल्कोहोल शोषून घेते. अल्कोहोल मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी सहा मिनिटे लागतात. इथेनॉल हा अल्कोहोलचा एक अतिशय लहान रेणू आहे. ते रक्त आणि पाण्यात विरघळते. मानवी शरीरात 70 ते 80 टक्के पाणी असते. त्यात विरघळल्यावर अल्कोहोल संपूर्ण शरीरात पसरते आणि मेंदूपर्यंत पोहोचते. एकदा डोक्यात, अल्कोहोल मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम करते. याचा परिणाम मज्जासंस्थेच्या केंद्रावर होतो. अल्कोहोलमुळे न्यूरोट्रांसमीटर विचित्र संदेश पाठवतात आणि मज्जासंस्था गोंधळून जाते. म्हणून आपल्याला अर्धंडोकीं (migration) सारखा त्रास होतो, चक्कर येणे सारख्या गोष्टी घडू शकतात.
दारूमुळे दात आणि घशावर होणारा दुष्परिणाम :-
दारू पिल्याने दात आणि घशावर परिणाम होतो. जास्त विषामुळे दातांचा इनॅमल बाहेर पडतो, ह्याने दात किडण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. घशाच्या पेशी कमकुवत होतात. घशाच्या स्नाह्यूना इजा होऊ शकते.
जिभेवर दुसरा परिणाम होतो,
दुसरा प्रभाव जिभेवर पडतो. नशेच्या अवस्थेत इंद्रियांचा जिभेवरील ताबा सुटतो आणि व्यक्ती शिवीगाळ करते.
दारूमुळे हृदयावर होणारे दुष्परिणाम :-
जास्त मद्यपान केल्याने हृदयविकारचा धोका वाढू शकतो.
जे लोक रोज दारूचे सेवन करतात त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता असते. दारूचे न-पिणाऱ्यांचा बाबतीत असे फारसे घडून येत नाही. दररोज दारू पिणाऱ्या महिलांना पुरुषांपेक्षा हृदयविकार होण्याची शक्यता जास्त वर्तवली गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका वाढतो (दारू पिण्याचे दुष्परिणाम-Side Effects OF Alcohol ) जसे की उच्च रक्तदाब, हृदय अपयश, स्ट्रोक. आणि आपले हृदय कमजोर होणे अशे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात.
दारूमुळे यकृतावर (Liver) काय दुष्परिणाम होतात :-
अनेक शोधातून आणि अभ्यासातून असे समोर आले. आहे आणि डॉक्टरांचेही म्हणणे आहे की यकृताचे सर्वाधिक नुकसान अल्कोहोलच्या सेवनाने होते .यकृत शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ तोडून काढून टाकण्याचे काम करते. तथापि, नियमितपणे मोठ्या प्रमाणात मद्यपान किंवा दारूपिल्याने यकृताच्या या सर्व महत्वाच्या प्रक्रियांमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि यकृताचा दाह आणि यकृत रोगाचा धोका देखील वाढू शकतो. यकृताच्या आजारामुळे, विष आणि हानिकारक पदार्थ शरीरात जमा होतात, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. पण जर तुमचे दारू पिण्याचे प्रमाण कमी असेल तर तुमच्या यकृतावर फारसा प्रभाव होत नाही किंवा त्रास होत नाही. पण तुम्ही दारूचे सेवन अतिप्रमाणात करत असणार तर त्याचा धोकादायक त्रास हा कालांतराने निश्चितच तुमचा यकृतावर होऊ शकतो. (side effects of alcohol)
दारूच्या सेवनाने वंध्यत्वाची ( Infertility) समस्या उद्भवू शकते :-
अनेक अभ्यासकांचे किंवा तद्यांचे असे मत की, गर्भवती महिलांनी मद्यपान केल्याने त्यांना आणि तसेच त्यांच्या पोटातील बाळालाही हानी पोहचू शकते. यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात, फेटल अल्कोहोल सिंड्रोम डिसऑर्डर (FASD) किंवा मृत बाळाचा जन्म होऊ शकतो आणि हे फार वाईट प्रसंग असू शकतो. आणि एवढेच नाही तर एका सर्वे मध्ये 21-45 वयोगटातील 6,120 महिलांचे निरीक्षण करण्यात आले. आणि संशोधकांना असे आढळून आले की ज्या स्त्रिया आठवड्यातून किमान 14 अल्कोहोलयुक्त पेये पितात (म्हणजे दररोज सुमारे दोन पेये होती) त्या स्त्रियांच्या तुलनेत 18% कमी गर्भधारणा होते ज्यांनी कधी दारुचे सेवन सुद्धा केले नव्हते.
दारूमुळे रक्तामधले साखरेचे प्रमाण कमी होणे :-
रक्तामध्ये नेहमी काही विशिष्ट प्रमाणात साखरेचे प्रमाण असणे महत्त्वाचे आहे. पण अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यास, त्याचा परिणाम शरीरातील रक्तामध्ये असलेले साखरेचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होते. ज्याला हायपोग्लाईसेमिया (hypoglycemia) असं म्हटलं जातं. याचा स्वादुपिंडावर (Pancreas) परिणाम हतो, आणि साखर कमी झाल्याने तुम्हाला थरथरणे आणि बेशुद्ध पडण्यासारखी समस्या उदभवू शकते. आणि इतकंच नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास, मेंदूवरही परिणाम होऊन तुमची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दारूचे अति सेवन करणे हे घातक ठरते.
आतड्यांवर होणारे दुष्परिणाम ( Intestinal Side Effects ) :-
दारूच्या सेवनाने आतड्यांवर परिणाम होतात. दारूमुले व्हिटॅमिन आणि महत्वाचे पोषक तत्वाचे शोषण होते. शरीराला व्हिटॅमिन पुरवण्यासाठी दारू अडचण निर्माण करते. ह्यामुळे कुपोषणाची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे तुमच्या आतड्यांवर परिणाम होऊन तुमचे शरीर बारीक होण्यास सुरवात होते. आणि तुमची तब्बेत बळकट न-राहता हळूहळू कमजोर होण्यास सुरवात होते.
लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परिणाम :-
सुरुवातीला, जेव्हा एखादा माणूस कमी प्रमाणात दारूचे (Alcohol ) सेवन करतो, तेव्हा ते त्याच्यासाठी चांगले काम करते. कारण जेव्हा पुरुषाच्या मनात भीती किंवा तणाव नसतो तेव्हा त्याची लैंगिक कार्यक्षमताही सुधारते.
पण जेव्हा पुरुषाची दारू पिण्याची मर्यादा वाढते किंवा तो अतिप्रमाणात दारूचे सेवन करतो, तेव्हा त्याची लैंगिक शक्ती कमी होते. त्याला इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या आहे. याचे कारण असे की अल्कोहोल जननेंद्रियांमध्ये रक्तप्रवाह रोखते. दुसऱ्या मज्जासंस्थेच्या पूर्ण सुन्नतेमुळे, मेंदूला स्पष्ट सिग्नल पाठवता येत नाही की त्या व्यक्तीला यापुढे तणावाची गरज नाही. अशा प्रकारे, त्याला इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि दीर्घकाळ मद्यपान केल्याने ही समस्या कायमची होऊ शकते. आणि त्यामुळे त्याची लैंगिक क्षमता कमकुवत होत जाते. आणि त्याचे ताण वाढत जाते. आपली सेक्सऊल आयुष्य नीटनेटके ठेवायचे असेल तर दारू पिण्याचे प्रमाण हे नियमित ठवणे गरजेचे आहे.

FAQ :- दारू चे दुष्परिणाम | Side Effects Of Alcohol In Marathi.
दारूची सवय सोडता येते का?
जगात अशी कोणती गोष्ट नाही कि त्याची सवय लागली कि ती सोडता येत नाही. दारूची सवय निश्चितच सोडता येत. आपण जर मनाशी ठाम असलो एक निश्चय असलो कि सगळं शक्य असते. तुम्ही निश्चय केला कि दारू सोडायची आहे तर तुम्ही सोडू शकतात. नाही तर हळू हळू दारूचे प्रमाण कमी करत-करत तुम्ही दारू सोडू शकतात , नाहीच शक्य झाला तर नाशामुक्ती केंद्र आहेतच.
दारूची नशा कशी उतरवायची ?
नशा उतरवण्यासाठी नुसतं लिंबूचे पाणी , त्यात साखर टाकायची नाही. किंवा संत्र्याचा रस , किंवा एखाद आंबट फळ खायला देणे, किंवा कोरा चहा. ह्यामुळे दारू उतरण्यास मदत होते आणि डोक्याची झालेली गरगर देखील कमी होते.
दारूमुळे शरीरातील कोणत्या अवयवाला जास्त त्रास होतो?
दारूचे अतीप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला हानी पोहचते , पण सगळ्यात जास्त त्रास यकृताला होते , यकृत खराब झाले कि माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
conclusion :- दारू चे दुष्परिणाम | Side Effects Of Alcohol In Marathi.
आपण बघितल्या प्रमाणे, दारूममुळे आपल्या शरीराला विविध प्रकारे हानी होऊ शकते , आपण दारूमुळे होणारे दुष्परिणाम बघितले. दारू पिणे वाईट आहे किंवा चांगले याबद्दल स्पष्टीकरण देणे जरा अवघडच आहे. पण दारू किती प्रमाणात घ्यावी याची एक मर्यादा असते. दारू तुम्ही कमी प्रमाणात घेत असणार किंवा नियमित स्वरूपात तुम्ही दारूचे सेवन करत असणार तर त्याचे दुष्परिणाम तुमचा शरीरावर दिसणार नाही, मात्र तेच जर तुम्ही अतिप्रमाणत दारूचे सेवन करत असणार तर त्याचे फार वाईट परिणाम तुमचा शरीरावर होणार हे निश्चित.