Difference Between Rum And Whisky In Marathi – नमस्कार , आपल्यातील काही जण पार्टी , लग्न जातच असतील. मित्रांची वाढदिवसाची पार्टी खास करून महाविद्यालयातील विध्यार्थी . तेव्हा जर तुमचे मद्य पेयचा विचार झाला तर तुमचे लक्ष फक्त रम आणि व्हिस्की यांवर जाते. खूप साऱ्या लोकांना जास्त करून ह्याच दोन गोष्टी आवडतात. आणि तर काहींना हे सारखेच आहे असे वाटते. परंतु तसे नाही. या दोघांमध्ये खुप फरक आहे. पण तुम्हाला यातील फरक माहिती का? जर माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला यातील फरक सविस्तर सांगणार आहोत तर तुम्ही हा फरक नक्की नक्की वाचा.
व्हिस्की आणि रम मधील फरक Difference Between Rum And Whisky In Marathi जाणून घेण्याआधी नेमके रम आणि व्हिस्की म्हणजे काय हे बघूया.
Table of Contents
रम म्हणजे काय? – What Is Rum?
रम हि ऊसाच्या रस आणि गुळा बरोबर उसाचे उत्पादने वापरून तयार केली जाते. यामध्ये डिस्टिलेशन आणि किण्वन (Fermentation) यांचा समावेश होतो. हे एक मद्य पेय आहे. रम हि जगभरामधे खूप लोकप्रिय आहे. कॅरिबियन बेटे आणि लॅटिन अमेरिका हे जगातील रमचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. रम बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जे यीस्ट असते ते गुळामध्ये मिसळले जाते आणि इच्छित चव तयार करण्यासाठी नियंत्रित पद्धतीने किण्वन केले जाते. किण्वन आणि डिस्टिलेशन हि प्रक्रिया झाल्या नंतर हे एक अल्कोहोलयुक्त पेय बनते जे विविध ग्राहकांच्या वेगवेगळ्या चवीनुसार चांगले परिपक्व आणि मिश्रित असते.
रम चे विविध प्रकार – Different Types of Rum In Marathi
रमचे विविध प्रकार खाली दिले आहेत.
- हलकी रम ( Light Rum ) – रमच्या रंग श्रेणीमध्ये स्पष्ट किंवा हलका असा असतो. सामान्यतः ह्या रम ला पांढरी रम म्हणून सुद्धा ओळखली जाते . ह्या रम ची चव हलकी आहे आणि सामान्यतः हि इतर पेयांमध्ये मिसळवण्यासाठी वापरली जाते.
- गडद रम (Dark Rum) : – गडद रंगाच्या रम मध्ये काळ्या, तपकिरी किंवा लाल रंगाच्या इतर श्रेणींचा समावेश असू शकतो. हि रम जास्त काळ परिपक्व केली जाते. मजबूत आणि गोड चव निर्माण करण्यासाठी हि रम जळलेल्या लाकडी बॅरल्समध्ये ठेवली जाते.
- मसालेदार रम (Spiced Rum) : – दालचिनी, मिरपूड आणि बडीशोप यांसारखी चव असलेली गडद रम म्हणजे मसालेदार रम. ह्या रम मध्ये यांच्या चवीचा एक वेगळाच अनुभव असतो.
- गोल्ड रम : – हि रम पांढऱ्या ओक च्या बॅरलमध्ये परिपक्व केली जाते. हि सहसा अंबर रंगाची असते.
- प्रीमियम रम : – हि रम उच्च-गुणवत्तेच्या कच्च्या मालापासून आणि काळजीपूर्वक परिपक्व केलेली असते . इतर प्रकारांच्या तुलनेत यामध्ये अधिक चव आणि सुगंध असत्तो आणि सामान्यतः हि रम जास्त किंमतीला विकली जाते.
व्हिस्की काय आहे? – What Is Whisky In Marathi?
व्हिस्की हे देखील एक प्रकारचे डिस्टिल्ड अल्कोहोलिक पेय आहे परंतु व्हिस्की हि रमच्या तुलनेत आंबलेल्या धान्य मॅशपासून बनवली जाते.
मका , गहू, राइ नावाचे धान्य आणि बार्ली यांचा वापर करून विविध व्हिस्कीचे प्रकार तयार केले जातात.
गरजेनुसार धान्य देखील माल्ट केले जाते. व्हिस्की हि सामान्यतः जळलेल्या पांढऱ्या ओक बॅरलमध्ये परिपक्व केली जाते.
व्हिस्कीचे जगामध्ये प्रकार आहेत.
विविध प्रकारच्या व्हिस्कीचे सामान्य एकत्रीकरण करणारे घटक म्हणजे डिस्टिलेशन हे आहे. वापरलेले धान्य आंबवने आणि लाकडी पांढर्या ओक बॅरलमध्ये परिपक्व होण्यास ठेवणे हे यामध्ये केले जाते. व्हिस्की कशी तयार केली जाते हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे.
व्हिस्कीचे वेगवेगळे प्रकार – Different types of whisky In Marathi
व्हिस्कीचे वेगवेगवेगळे प्रकार पडतात ते आपण बघूया.व्हिस्की च्या प्रकारांचे वर्गीकरण हे माल्ट किंवा धान्यात केले जाते. माल्ट हा प्रकार प्रामुख्याने माल्ट बार्लीपासून बनवले जाते, तर धान्य व्हिस्की कोणत्याही प्रकारच्या धान्यापासून बनवता येते.
व्हिस्कीच्या इतर वर्गीकरणांमध्ये खाली दिलेले घटक समाविष्ट आहे.
- सिंगल माल्ट : – व्हिस्की चा हा प्रकार एकाच धान्याच्या प्रक्रियेपासून बनवली जाते आणि एकाच डिस्टिलरीमधून ती तयार केली जाते.
- मिश्रित माल्ट (Blended Malt) : – व्हिस्कीच्या ह्या प्रकारामध्ये इतर अनेक डिस्टिलरीजमधील विविध व्हिस्की आणून एकत्र केल्या जातात.
- कास्क स्ट्रेंथ :-बाटलीबंद व्हिस्की हि थेट कास्कमधून भरली जाते आणि ती कोणत्याच प्रकारे पातळ केली जात नाही.
- सिंगल कास्क : – यामध्ये व्हिस्की हि एकाच बॅरेलच्या डब्यामध्ये परिपक्व केली जाते.
- मिश्रित व्हिस्की : – हि व्हिस्की रंग, स्पिरिट आणि चवीसह धान्य आणि माल्ट यांचे एकत्रीकरण बनवली जाते.
हे देखील वाचा – – महाराष्ट्रातील लोकप्रिय व्हिस्की
रम आणि व्हिस्की मधील फरक – Difference Between Rum And Whisky In Marathi
रम आणि व्हिस्की यांतील मुख्य फरकांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहे :
रम चे आणि व्हिस्कीचे उत्पादन – Difference Between Rum And Whisky In Marathi
व्हिस्की हि राई , बार्ली आणि गहू यांसारख्या विविध आंबलेल्या धान्यांपासून बनवली जाते, तर रम हे उसाचा रस, गूळ आणि मध यांसारख्या उसाच्या पदार्थांपासून बनवली जाते.
रम आणि व्हिस्की मधील अल्कोहोलचे प्रमाण – Difference Between Rum And Whisky In Marathi
रममधील अल्कोहोलचे प्रमाण हे देशानुसार बदलत असते आणि तिची किमान सरासरी पातळी 40% ते 60% मध्ये असते.
व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे 40% असते.
रम आणि व्हिस्कीच्या चवींमधील फरक – Difference Between Rum And Whisky In Marathi
रम आणि व्हिस्की या दोन्ही पेयांमध्ये विविध प्रकारचे स्वाद आणि रंग आहेत. ही वैशिष्ट्ये रंग, त्यांचे वय तसेच प्रत्येकामध्ये जोडलेल्या अतिरिक्त घटकांवर अवलंबून असतात.
रम समृद्ध आणि मसालेदार असते तर व्हिस्की हि सुगंधी असते .
रम व्हिस्कीपेक्षा गोड असते तर व्हिस्कीला जुन्या बॅरलची चव असते .
रम आणि व्हिस्कीचा आरोग्याला होणार फायदा आणि परिणाम – Difference Between Rum And Whisky In Marathi
व्हिस्कीचे वय वाढत असताना ते पेलेजिक ऍसिड तयार करते आणि ते शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करते असे मानले जाते. व्हिस्की पिण्याचे फायदे हे आश्चर्यजनक आहेत. तसेच व्हिस्की पिण्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत
दुसरीकडे, हाडांमधील खनिजांची घनता वाढवण्यासाठी रम (थोड्या प्रमाणात तरी) आढळून आली आहे. रम देखील संधिवात सारख्या जीवनशैलीच्या आजारांची लक्षणे कमी करते.
निष्कर्ष – व्हिस्की आणि रम मधील फरक
प्रत्येकाची पेयाची निवड हि त्यांच्या आवडीनुसार असते. जेव्हा तुम्ही रम आणि व्हिस्कीचा विचार कराल तर हाच फरक तिथे लागू होईल. जरी यांमध्ये फरक आहेत,तरीसुद्धा त्याची निवड पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक अभिरुचीवर आणि कार्यासारख्या इतर गरजांवर अवलंबून आहे.
FAQ – व्हिस्की आणि रम मधील फरक
1. कोणत्या देशामध्ये सर्वाधिक रम घेतली जाते ?
– भारतामध्ये रम हि सर्वाधिक घेतली जाते.
2. रम थंड करावी का?
– रम हि फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण उच्च अल्कोहोल प्रमाण त्यांची अखंडता टिकवून ठेवते.
आमच्या इतर पोस्ट –
- नवीन व्यक्तींसाठी कोणती व्हिस्की चांगली आहे
- जगातील 10 सर्वात महाग व्हिस्की
- जगातील १० सुप्रसिद्ध व्हिस्की
- भारतातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रँड
- ऋतूनुसार कोणती व्हिस्की चांगली
Team, Mywhiskyprices.com